Ad will apear here
Next
पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी ४४ हजार ईव्हीएम, २० हजार व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज
७३ हजार कर्मचारी १४ हजार मतदान केंद्रांवर कार्यरत
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघामध्ये ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत आहे. आठवडाभरावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघात १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत, तर एक  कोटी ३० लाख ३५ हजार मतदार आहेत. त्यामध्ये ६६ लाख ७१ हजार पुरुष, तर ६३ लाख ६४ हजार महिला आणि १८१ तृतीयपंथी मतदार आहेत. यांच्यासाठी सुमारे ४४ हजार ईव्हीएम यंत्र आणि २० हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली असून, सुमारे ७३ हजार ८३७ कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

राज्यात एकूण चार टप्प्यांत मतदान होणार असून, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघामध्ये ११ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. वाढते तापमान लक्षात घेता या मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, तसेच सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

मतदानासाठी लागणारे साहित्य जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. गडचिरोली-चिमूर या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी सात ते दुपारी तीन अशी करण्यात आली आहे. वर्धा मतदारसंघात सुमारे दोन हजार २६ मतदान केंद्रे असून, आठ लाख ९३ हजार पुरुष, तर आठ लाख ४८ हजार महिला मतदार आहेत. या मतदार संघात १४ लाख ४१ हजार एकूण मतदार आहेत. रामटेक मतदारसंघात दोन हजार ३६४ मतदान केंद्र असून, नऊ लाख ९६ हजार पुरुष, तर नऊ लाख २४ हजार महिला अशी एकूण १९ लाख २१ हजार मतदार आहेत.

नागपूर मतदारसंघात दोन हजार ६५ मतदान केंद्र आहेत. १० लाख ९६ हजार पुरुष, तर १० लाख ६३ हजार महिला असे एकूण २१ लाख ६० हजार एकूण मतदार आहेत. भंडारा-गोंदिया मतदारसंघात दोन हजार १८४ मतदान केंद्र आहेत. नऊ लाख पाच हजार पुरुष, तर नऊ लाख तीन हजार महिला, असे एकूण १८ लाख आठ हजार मतदार आहेत. गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी एक हजार ८८१ मतदान केंद्र असून, सात लाख ९९ हजार पुरुष आणि सात लाख ८० हजार महिला, असे एकूण १५ लाख ८० हजार मतदार आहेत. चंद्रपूर मतदारसंघामध्ये दोन हजार १९३ मतदान केंद्र असून, नऊ लाख ८६ हजार पुरुष आणि नऊ लाख २२ हजार महिला, असे एकूण १९ लाख आठ हजार मतदार आहेत. यवतमाळ-वाशिम मतदार संघामध्ये दोन हजार २०६ मतदान केंद्र आहेत. नऊ लाख ९३ हजार पुरुष मतदार, तर नऊ लाख २१ हजार महिला, असे एकूण १९ लाख १४ हजार मतदार आहेत.

ज्या मतदारसंघात १५ पेक्षा जास्त उमेदवार आहेत, अशा मतदान केंद्रांवर दोन बॅलेट युनिट बसविण्यात येतात. त्यासोबत एक कंट्रोल युनिट असते. पहिल्या टप्प्यासाठी २६ हजार बॅलेट युनिट आणि १८ हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून, २० हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर राखीव यंत्र देण्यात आली आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZVJBZ
Similar Posts
उमेदवारांचे भवितव्य सीलबंद करणारी कामगिरी ‘लाख’मोलाची मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात सील होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची मोलाची कामगिरी बजावायला ‘लाखे’चा वापर केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान
उष्म्यातून थोडासा दिलासा पुणे : सध्या देशासह राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली असल्यामुळे नागरिक कमालीच्या उकाड्याने हैराण झाले आहेत मात्र आगामी एक-दोन दिवसांत विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागांत तापमान काहीसे घटण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  मध्य महाराष्ट्र व विदर्भात
‘व्हीव्हीपॅट’संदर्भात सहा लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी या वर्षी प्रथमच व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रांचा वापर केला जाणार असून, महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांसाठी ९६ हजार यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील ९६ हजार मतदान केंद्रांवरील सहा लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सध्या सुरू असून, त्यांना तीन स्तरावर प्रशिक्षण दिले जाणार आहे
नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष नियुक्त्या जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सन २०१८-२० पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक पार पडली असून, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language